शुक्रवार, ११ डिसेंबर, २०१५

दुचाकी कर्ज २०१५

जय बजरंग स्वयं:सहाय्यता बचतगट बालमटाकळी दुचाकी कर्ज प्रकरण सन २०१५ 

जय बजरंग स्वयं:सहाय्यता बचतगट बालमटाकळी मार्फत सभासदांना स्वतःची दुचाकी घेण्यास प्रेरणा म्हणून बचतगटाकडून दुचाकी कर्ज देण्यात येते  .दुचाकी कर्जाची कर्ज मर्यादा हि  दुचाकी गाडीच्या कोटेशन  रकमेच्या ७५ %किव्हा रक्कम रुपये ४०,००० इतके देण्यात येते.हि योजनेचा लाभ सभासदांसाठीच असून .त्याव्यतिरिक्त बचट गटाच्या बाहेरील व्यक्तीस सभासदाच्या शिफारसी नुसार देण्यात येते .सन २०१५  मध्ये २ दुचाकी कर्ज देण्यात आले असून त्या व्यतिरिक्त २ वैयक्तिक कर्ज देण्यात आलेले आहेत.

१) श्री.संदीप बाबासाहेब दळवी यांना बचत गटाकडून पहिले दुचाकी कर्ज देण्यात आले.त्यांना  बजाज  CT 100 या गाडीची चावी देताना बचतगट अध्यक्ष मा.श्री.लक्ष्मण पोपळभट  व चावी स्वीकारताना श्री.संदीप दळवी .व डावीकडून बचतगट सभासद ऋषिकेश राऊत,सुनील शिंदे,किशोर सुरवसे ,सोपान शेटे 



२)श्री.मधुकर देविदास गवंडर यांना बचतगटाकडून hero CD डिलक्स या गाडीची चावी देताना डावीकडून  बचतगट सचिव श्री.ऋषिकेश राऊत व उजवीकडून चावी स्वीकारताना श्री.मधुकर गवंडर व या प्रसंगी उपस्थित सभासद डावीकडून श्री संदीप दळवी,नवनाथ सोनवणे ,ज्ञानेश्वर शेटे ,अध्यक्ष लक्ष्मण पोपळभट आणि सोपान शेटे,गाडीवर बसलेला पार्थ दादा शेटे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा