जय बजरंग स्वयं सहाय्यता बचतगट बालमटाकळी
नमस्कार ,
तुम्हाला आमच्या बद्दल जाणून घ्यायची इछ्या आहे त्याबद्दल आमच्या बचत गटाकडून आपले स्वागत करतो .साधारणतः इतर बचतगटा सारखाच आमचा बचत गट आहे . ह्या बचतगटाचे नाव जय बजरंग स्वयं सहाय्यता बचतगट असून त्याची स्थापना सन २०१४ गुढीपाडवा या दिवशी करण्यात आली १४ सभासद ह्यात आहेत .सर्व सभासद हे सुशिक्षित असून .अतिशय हुशार व होतकरू आहेत .आम्ही अध्यक्ष्य व सचिव ह्या व्यतिरिक्त कुठलाही पद निर्माण केलेले नाही .उदा.उपाध्यक्ष ,खजिनदार ई.ह्याचे कारण कि पदामुळे वाद वाढत असतात .ते टाळण्यासाठी आवशक तेवढीच पद ठेवलीत .गटाचा आर्थिक हिशोब मा.अध्यक्ष ठेवतात व इतर सर्व रेकॉर्ड मा.सचिव सांभाळतात .गटाने येणाऱ्या पैशाची गुंतवणूक शेळीपालन यात केलेली आहे .त्यासाठी लाघाणारे .२ शेड गटाने तयार केले असून त्यात १८ शेळ्या १ बोकड यांचे पालन पोषण करण्यात येत आहे . या व्यतिरिक्त सभासदांना वैयक्तिक कर्ज देण्यात येते. सभासदांनी जमा केलेल्या मासिक रक्कमेचा व डीपोझीट रक्कमेच्या हिशोबासाठी त्यांना वयक्तिक पासबुक देण्यात आले आहे .गटाची स्वताची एक नियमावली असून तिचे काटेकोर पणे पालन करण्यात येते .सभासद हयात नसल्यास त्याची रक्कम हि त्याने नोंद केलेल्या वारसांना देण्यात येते.
भविष्यामध्ये प्रत्येक सभासदाचा एक लाख रुपया पर्यंतचा वैयक्तिक विमा बचत गटा मार्फत उतरवण्याचा आमचा मानस आहे .आलेल्या नाफाचे वाटप गटाचे अर्थी वर्ष गुढीपाडवा ते गुढीपाडवा या दिवशी करण्यात येते.व वर्ष संपल्यावर वर्ष भराच्या घडामोडी व आर्थिक गोष्टींचा वार्षिक अहवाल वाटण्यात येतो .संपूर्ण व्यवहार पारदर्शकता ,शिक्षक अध्यक्ष व सचिव ,सुजाण सभासद मंडळ ,काहीतरी नवीन करण्याची धडपड हे आमचे पल्स मुद्दे आहेत. नवीन नवीन संकल्पना राबून बचतगट कसा जास्तीजास्त नफा कमवील याचा कायम प्रयत्न करण्यत येतो.नवीन कार्याला अतिशय सुंदर मुहूर्त लाभत गेलेले आहे जसे कि गुढीपाडव्याला गटाची स्थापना ,दिवाळीच्या पाडव्याला शेळीपालन उद्घाटन हनुमान जयंतीला वार्षिक सभा त्यामुळे आमच्यामध्ये एक नवी उभाडी उभी राहले व काम करण्यास ताकत येते .अश्या प्रकारे आमचा बचतगट असून तो खूप यशस्वी व्हावा हि प्रथांना करतो .जय बजरंगबली

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा