·
संकल्पना –
बचतगटात साधारणतः १२ ते २० सभासद असतात.बचतगटामुळे
त्यांना विना तारण कर्ज उपलब्ध होते व
त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण होत असतात .परंतु बचत गटात नसणारे काही लोक गटाकडे
कर्ज मागणी करतात .परंतु त्यांना सभासद नसल्यामुळे कर्ज देता येत नाही .अश्या
लोकांना बचत गटाचे स्थायी सभासदत्व देता येत नाही .त्यामुळे त्यांना तात्पुरते
सभासदत्व देऊन नाममात्र सभासद म्हणून
जोडण्यात यावे त्यामुळे त्यांना बचतगटाच्या सेवांचा लाभ घेता येईल .व बचतगटाचा व
व्यवहारही मोठ्या प्रमाणात होऊन बचतगट व सर्व
सभासदांचा फायदा होईल.
बाहेरील व्यक्तीला बचत गटाच्या मिळणाऱ्या सेवा घेता
याव्या यासाठी तात्पुरते दिलेले सभसदत्व म्हणजे नाममात्र सभसदत्व होय.
नाममात्र सभासदात्वामुळे बचतगटात सहभागी होऊ
इच्छिणाऱ्या लोकांना बचतगटाशी जोडण्याची संधी उपलब्ध होईल.बचतगटा आर्थिक व्यवहार स्वच्छ
असणारे सभासद मिळतील व बचतगटाचे आर्थिक व्यवहार योग्य रीतीने होऊन .आर्थिक
व्यवहारांचा विस्तार होऊन त्यचा फायदा सभासद व
नाममात्र सभासद यांना होईल. बचतगटा मार्फत उपलब्ध होणार्या कर्जाला खात्रीशील
व स्वच्छ् व्यवहार असणारे कर्जदार मिळतील.
नाममात्र सभासदत्व मिळाल्यामुळे नाममात्र सभासदांना बचतगटाशी आर्थिक व्यवहार करण्याचा अधिकार मिळेल .ज्यांचा
व्यवहार चांगला नाही आश्या लोकांना नाममात्र सभासद असल्यामुळे बचतगटातून काढून
टाकणे सोपे जाईल .ज्यांचा व्यवहार अधिक चांगला व स्वच्छ आहे आश्या नाममात्र
सभासदांना स्थायी सभासद करून घेता येईल .त्यामुळे
बचतगटाला खात्रीशीर सभासद मिळतील .
* नाममात्र सभासदासाठी
नियम :-
१)सभासदाने वयाचे १८
वर्ष पूर्ण केलेले असावे.
२)सभासद हा नोकरदार
किव्हा व्यावसाईक असावा .त्याला त्याचा स्वताचा उत्पन स्त्रोत असावा.
३)सभासद हा
बचतगटाच्या गावा पासून १५ किमी पेक्ष्या
जास्त लांब असलेल्या गावाचा नसावा.
४) सभासद होण्यासाठी
सभासदास ५००० हजार रुपये इतकी डीपोसिट रक्कम अर्ज सदर करतेवेळीस भरावी लागेल . व
बचतगटाने ठरवलेली मासिक वर्गणी दरमहा नियमित भरावी लागेल
५) नाममात्र सभासदाला
बचतगटाचा उत्पन्नाचा हिसा न देता त्यांनी भारालेल्या रकमेला द.सा.द.शे ३ ते ६ टक्के
च्या दरम्यान व्याजदर देण्यात येईल .
६) स्थायी सभासदांना दिल्या जाणारर्या सर्व सेवा व लाभ नाममात्र
सभासदास दिले जातील.
७) मासिक वर्गणी
नियम ,कर्ज नियम, हे स्थायी सभासद व
नाममात्र सभासद यांना एकच असतील .
८) बचतगटाच्या नवीन
नियम निर्णय सभेमध्ये नाममात्र सभासदाचा सहभाग नसेल .
९)बचतगटाणे घेतलेले
निर्णय व नवीन नियम हे सभासदास काटेकोरपणे पाळावे लागतील .
१०) नाममात्र सभासदाचे
सभसदत्व बचतगट कुठलेही स्पष्टीकरण न देता केव्हाही रद्द करू शकतो.
११) वरील नियमामध्ये
दुरुस्ती अथवा नवीन नियम करण्याचा अधिकार बचतगटाकडे राखीव असेल. व ते सभासदास मान्य असतील .
* नाममात्र सभासदाचे
फायदे -
१) उत्कृष
व्यवस्थापन असलेल्या बचतगटाशी जोडण्याची संधी मिळते
२)बचतगटाकडून
मिळणारे कमी व्याजदर कर्ज व इतर आर्थिक लाभ व सवलतीचा फायदा मिळतो
३)स्थायी सभासदांना
असणाऱ्या सर्व सवलतींचा लाभ नाममात्र सभासदांना मिळतो .
४) आपल्या पैशांचे
योग्य नियोजन व बचत करण्याची सवय लागते.
५) त्यांनी भरलेल्या
रकमेचा हिशोब लागावा म्हणून त्यांना बचत गटाकडून पासबुक मिळते .त्यामुळे स्वच्छ आर्थिक
व्यवहाराचा फायदा मिळतो.
* बचत गटाला फायदा :-
१)सभासदांची संख्या
वाढल्याने आर्थिक व्यवहाराचा विस्तार व वाढ होईल .
२)बचतगटाला
खात्रीशीर सभासद ,गुंतुवणूकदार ,कर्जदार मिळतील .
३)बचतगटाच्या रिक्त
असलेल्या स्थायी सभासदाच्या जागा भरण्यासाठी सभासद उपलब्ध होतात.
४) मासिक वर्गणीत
वाढ होऊन कर्ज रक्कम मर्यादा वाढवण्यास मदत मिळेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा